• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

मा. आ. श्री. प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

माळेगाव येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठी प्रसिद्ध अशी यात्रा भरते. हे खंडोबाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. माळेगाव हे महाराष्ट्रातील लोकनेते स्वर्गीय. विलासराव देशमुख यांचे कुलदैवत आहे, त्यांच्या वाड-वडिलांपासून ते माळेगावला येत होते त्यांच्यानंतर ही धुरा त्यांचा मुलगा अमित देशमुख हे समर्थपणे सांभाळत आहेत. २००४ला मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो. याचदरम्यान श्री. विलासराव देशमुख साहेबांनी ६ कोटीचा निधी माळेगाव विकासासाठी दिला.

मालेगावला जानावरांचा घोडे, उंट, गाढव यांचा मोठा बाजार भरतोआणि यामध्ये मोठी उलाढाल होते. येथील पशुप्रदर्शन भव्य आणि दिव्य आहे. या यात्रेत डोंबारी, कोलारी, वैदू, मसनजोगी अशा सगळ्या समाजातील लोक येतात तसेच येथे जात पंचायतही भरतात.

या यात्रेत लोककला, लावणी महोत्सव, कुस्ती असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात यामधून लोकांची करमणूक होते. माळेगाव सर्वाथाने आहे भक्तांचा, शौकिनांचा आणि उचल्यांचा. या यात्रेत गालिचे, चादर, हातमाग वस्तू यांची प्रचंड उलाढाल होते. सध्या येथे जिल्हापरिषदचे नियंत्रण आहे. रुस्तम धोंजगोंडे हे येथील माजी सभापती होते त्यांच्या काळात अनेक प्रकारचे कार्य मंदिरासाठी झाले.

हि यात्रा चम्पाश्रुस्टीला भरते. हि यात्रा आधी १० -१५ दिवस चालत होती आता वाहनांची सोय झाल्यामुळे ५ – १० दिवस हि यात्रा चालते. दिवाळीच्या काळात आसपासच्या ५ – ५० गावातून पाहुणे येथे येतात आणि येथे बेल भंडारा उधळला जातो. तळी उचलने अशे अनेकप्रकारचे कार्यक्रम येथे होतात.

तरी माझी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की, यात्रेच्या काळात माळेगावला येऊन खंडोबाचा आशीर्वाद घ्यावा आणि यात्रेत आपला सहभाग नोंदवावा.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys