• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

जेजुरी खंडोबा

जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी चंपाषष्ठी, दसरा व चैत्री पाडवा या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्या दिवशी प्रामुख्याने छबीना निघून पालखीमधून देव हे गडाखाली असणाऱ्या तलावामध्ये नेऊन तेथे धार्मिक स्नान घालतात. येथे मार्गशीर्षमध्ये नवरात्रोत्सवही साजरा करण्यात येतो. त्याशिवाय सोमवती अमावस्येस ठिकठिकाणीहून लाखो भक्तगण येथे येऊन भंडारा उधळतात. येथे विशेषकरून प्रसाद (भंडारा) हे कागद अगर प्लॅस्टिकच्या पिशवीत न घेता कापडी पिशवीतच घेतला जातो. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून विशाल, भव्यदिव्य आहे. मंदिरासमोर १०x१२ फूट लांबीची पितळी कासवाची प्रतिकृती आहे. त्यावरती खंडोबाच्या नावाने खोबरे व भंडारा उधळतात जातो व हा उधळलेला भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद वेचून घेतात.

. येथील प्रदक्षिणेच्या मार्गावरूनच सर्वसाधारपणे १॥ किलोमीटर अंतरावर कडेपठार हे खंडोबाचे वास्तव्याचे मूळ ठिकाण आहे. भाविक लोक आवर्जून तेथे जातात. देवास देणगीरूपाने पैसे मिळतात व पंच कमिटी या पैशातून वर्षभराचे धार्मिक खर्च करते. देवास वेगळे उत्पन्न नाही. मुख्य गुरवाकडून त्रिकाल देवतांची पूजा होते. मुख्य नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. खंडोबाचे मुख्य दैवत म्हणून वाघ्यामुरळी हे येथे प्रतिवर्षी हजेरी लावून जातात. इंदौरचे होळकर घराण्याचे खंडोबा हे कुलदैवत असून अहिल्याबाई होळकर यांनी सदर देवळाचा जीर्णोद्धार केला. गडाखाली भक्कम बांधकामाचे सरोवर (तलाव) आहे. धनगर समाजाचे लोक हे मुख्य दैवत म्हणून मानतात.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys