• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

कुस्ती

महाराष्ट्रात भरणाऱ्या सर्वच यात्रांच्या निमित्ताने कुस्तीच्या दंगली होत असतात. या ठिकाणीही गेल्या अनेक वर्षांपासून कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात येते. कुस्ती हा ग्रामीण जनतेचा अत्यंत आवडता व मर्दानी खेळ. या खेळातील व्यायामामुळे शरीरातील सर्व स्नायू व निरनिराळी इंद्रिये मजबूत व कार्यक्षम बनतात. ही विद्या जाणणारा कमी ताकदीचा मनुष्यदेखील जास्त ताकदवान प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवू शकतो.

या यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल भरवण्यासाठी माळावर गोलाकार कडेकरण्यात येते. या कड्यातील दगड गोटे बाजूला काढून टाकतात. कमरेला लंगोट बांधून त्यावर जांग घातलेली निरनिराळ्या वयोगटाचे व वजनी गटाचे पहिलवान आपल्या जोडील्या, प्रतिस्पर्ध्याला नजरेने जोखत असतात. दंडावर किंवा मांडीवर शड्डू ठोकून आव्हान देत असतात. प्रतिस्पर्ध्यावर किंवा उपस्थित प्रेक्षकांवर आपली छाप पाडण्याचा प्रत्यन करत असतात. विजयी झालेल्या पहिलवानांची ढोल-ताश्यांच्या गजरात गुलाल उधळीत हारे-तुरे घालून मिरवणूक काढली जाते.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys